बोपोडीत भीमगीतांचा जल्लोष; राहुल साठे यांच्या दमदार सादरीकरणाने रंगला संयुक्त जयंती महोत्सव

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात भीमगीतांनी वातावरण भारावून गेले। विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला।
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय गायक आयकॉन स्टार राहुल साठे आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या दमदार भीमगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली।
कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. विजय खरे, समितीचे अध्यक्ष, उपमहापौर परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश कदम, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, संदीप धांडोरे आदी मान्यवर उपस्थित होते।
“प्रथम तुज वंदना”, “पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे”, “सोनियांची उगवली सकाळ”, “माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का”, “किती शोभला असता भीम नोटांवर”, “माझ्या भीमाची पुण्याई”, “जिवाला जीवाच दान”, “भीमाची लेखणी”, “नांदण नांदण नंदन” आणि “माझ्या भीमाच्या नावाचं” या गीतांनी संपूर्ण परिसरात उत्साहाची लहर निर्माण केली।
याशिवाय “भले भले पुढारी करतात भीमाला सलाम” या गीतासह विविध सादरीकरणांना प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. ओमप्रकाश सोनवणे आणि अभिजीत भवर यांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली।
Author: Aman Deep Walia
Aman Deep Walia Founder/Editor-In-Chief Amanopedia News Aman Deep Walia, also known as Aadi, is an Indian media entrepreneur, actor, producer, writer, and director based in Mumbai, India. As the Founder and Editor-in-Chief of AMANOPEDIA News, he leads a fast-growing digital entertainment platform delivering verified industry updates, celebrity features, and cultural commentary across web and social media. With creative credits spanning films, theatre, and advertising. Aman brings a multidisciplinary perspective to storytelling. His work reflects a commitment to authenticity, versatility, and audience-driven narratives across genres. Beyond performance and production, he is actively engaged as a journalist and digital content creator, bridging mainstream cinema with emerging media formats. He has also contributed as a casting director and lyricist, further expanding his creative footprint within the Indian entertainment landscape. Through AMANOPEDIA, Aman Deep Walia continues to position himself at the intersection of journalism, cinema, and digital innovation.



