The perspective on news will change when the truth reaches you. All the important news about the country is brought to you only on Amanopedia News. Click on contact us to connect with us.

खबरों का नज़रिया बदलेगा, जब सच आप तक पहुंचेगा।

आशिष शेलार यांच्याकडून ‘आदि अनंत’चे भरभरून कौतुक!

आशिष शेलार यांच्याकडून ‘आदि अनंत’चे भरभरून कौतुक!

नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा आणि आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे, भावनिक मांडणीचे आणि हृदयस्पर्शी कथेचे प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही हा चित्रपट पाहून त्याचे भरभरून कौतुक केले आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट असल्याचे सांगत त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहनही केले आहे.

‘आदि अनंत’ पाहिल्यानंतर आशिष शेलार यांनी चित्रपटाच्या आशयाचे, कलाकारांच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शकीय मांडणीचे विशेष कौतुक केले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाला आणि नात्यांना वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांसोबत अनुभवावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कौतुकामुळे चित्रपटाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

याआधीही प्रेक्षक, समीक्षक आणि मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांकडून ‘आदि अनंत’चे कौतुक होत आहे. आता आशिष शेलार यांच्याकडून मिळालेली ही विशेष दाद चित्रपटाच्या भावनिक आशयाला मिळालेली महत्त्वपूर्ण पोचपावती ठरत आहे. आजोबा आणि नातवाच्या नात्यातील प्रेम, मस्ती, मतभेद, आठवणी आणि एकमेकांप्रती असलेली ओढ या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक होत आहे.

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आशिष शेलार यांच्यासारख्या मान्यवरांनी ‘आदि अनंत’ पाहून चित्रपटाचे इतक्या मनापासून कौतुक करणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांनी चित्रपटाचा आशय समजून घेतला आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा, असे आवाहन केले, ही आमच्यासाठी विशेष समाधानाची गोष्ट आहे. हा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे.”

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Aman Deep Walia
Author: Aman Deep Walia

Aman Deep Walia Founder/Editor-In-Chief Amanopedia News Aman Deep Walia, also known as Aadi, is an Indian media entrepreneur, actor, producer, writer, and director based in Mumbai, India. As the Founder and Editor-in-Chief of AMANOPEDIA News, he leads a fast-growing digital entertainment platform delivering verified industry updates, celebrity features, and cultural commentary across web and social media. With creative credits spanning films, theatre, and advertising. Aman brings a multidisciplinary perspective to storytelling. His work reflects a commitment to authenticity, versatility, and audience-driven narratives across genres. Beyond performance and production, he is actively engaged as a journalist and digital content creator, bridging mainstream cinema with emerging media formats. He has also contributed as a casting director and lyricist, further expanding his creative footprint within the Indian entertainment landscape. Through AMANOPEDIA, Aman Deep Walia continues to position himself at the intersection of journalism, cinema, and digital innovation.